शिक्षण-गप्पा
शिक्षक विद्यार्थी पालक यांच्यासाठी नवनवीन शैक्षणिक घडामोडी मिळण्यासाठी असलेल हक्काचा व्यासपीठ
Monday, August 4, 2025
Sunday, November 10, 2024
टपाली मतदान कसे करावे
Monday, October 7, 2024
MDM अटेंडस अँपवर भरलेली विद्यार्थी हजेरी कशी चेक करायची
Thursday, October 3, 2024
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केलेल्या मराठी भाषेला जवळपास 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. आज केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही मोठी अभिमानाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत मागणी सुरु होती. केंद्र सरकारच्या अख्यत्यारित ही बाब असते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा (Classical Language Status to Marathi) मिळाल्याने अनेक साहित्यिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय (Ministry of Culture) या बाबत निर्णय घेत असतो. आतापर्यंत अनेक भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये याबाबत तरतूद करण्यात आली आहे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काय निकष असतात
1) भाषेचे साहित्य हे किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावे लागते.
2) भाषेतील प्राचीन साहित्य मौल्यवान असावे.
3) भाषेला स्वतःचे स्वयंभू पण असावं लागतं ती इतर भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
4) भाषेचे स्वरुप इतर भाषेपासून वेगळे असावे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?
1) अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
2) अभिजात भाषेचा दर्जा मिळल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येते.
3) अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.
सध्या देशात तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. आता यामध्ये मराठी भाषेचा देखील समावेश करण्यात आला आहे.
Friday, September 20, 2024
राज्यातील सर्व शाळेत स्वच्छता अभियान अंतर्गत 'स्वच्छता ही सेवा' हा उपक्रम राबविण्यात येणार !
राज्यातील सर्व शाळेत स्वच्छता अभियान अंतर्गत 'स्वच्छता ही सेवा' हा उपक्रम राबविण्यात येणार !
उपरोक्त विषयाचे अनुषंगाने शासन निर्देशानुसार केंद्र शासनाच्या वतीने देशभरात दिनांक १४ सप्टेंबर २०२४ ते दिनांक ०२ आक्टोंबर २०२४ या कालावधीत "स्वच्छता हि सेवा" उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्या बाबत शासन निर्देश आहेत
सदर उपक्रम हा सर्वच शासकिय विभांगांना राबविणे अनिवार्य आहे.
या मध्ये शालेय स्तरावर खालील प्रमाणे उपक्रम
१) टाकऊ पासून टिकावू वस्तू तयार करणे.
२) रॅली चे आयोजन करणे
३) शालेय परिसर व ग्राम परिसर स्वच्छता श्रमदान
४) सांस्कृतिक कार्यक्रम / पथनाटय
५) स्वच्छता प्रतिज्ञा
६) स्वच्छतेवर आधारीत विविध स्पर्धा भाषण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच विविध खेळ प्रतियोगीता आयोजीत करणे.
करिता आपण सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्यध्यापकांना अवगत करुन या मध्ये सदर उपक्रमाचे काटेकोर नियोजन व अंमलबजावणी करणे करिता आदेशित करावे
तालुका व ग्रामस्तरावर सफाई कर्मचारी यांचे सफाई मित्र शिबीर आयोजीत करावयाचे असून, तालुका वैद्यकिय अधिकारी यांनी सदर कर्मचा- यांची आरोग्य तपासणी तसेच त्यांना हातमोजे, मास्क ई. सुविधा शिबीरा मध्ये उपलब्ध करुन देणे बाबत संबधीताना अवगत करावे. यात हयगय होणार नाही यांची दक्षता घ्यावी.
ग्रामपंचायत स्तरावर दिनांक १४ सप्टेंबर २०२४ ते दिनांक ०२ आक्टोंबर २०२४ अनेक उपक्रम राबविण्यात येणार असून, ग्रामस्तरावर कार्यरत सीआरपी यांचे माध्यमातून सर्व उपक्रमांमध्ये महिला बचत गटाच्या सदस्यांनी सक्रीय सहभाग नोंदवावा या करिता तालुका अभियान व्यवस्थापक उमेद यांनी नियमीत पाठपुरावा
करावा.
स्वच्छता शपथ व प्रमाणपत्र
स्वच्छता हि सेवा उपक्रमाची यशस्वी अंमबजावणी करुन दिनांक १४ सप्टेंबर २०२४ ते दिनांक ०२ आक्टोंबर २०२४ या कालावधीत शासनाने नेमुण दिलेल्या सर्व उपक्रमांची काटेकोर अंमबजावणी होईल तसेच सर्व उपक्रमांचे
Link
या केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर इव्हेंट क्रीऐट करुन उपक्रम राबवून त्याचे फोटो अपलोड करून इव्हेन्ट क्लोज करुन घेणे
खालील लिंकवर क्लिक करा आणि नोंदणी करा
Labels: शासकीय परिपत्रक
Thursday, September 19, 2024
*#udiseplus 2024 मध्ये विद्यार्थी माहिती GP-EP-FP पटापट कशी भरावी ..* #Shikshangappa⏩⏩⏩⏩⏩
Labels: शिक्षकांसाठी व्हिडीओ
Tuesday, September 17, 2024
*#महावाचन अभियान शाळा नोंदणी विद्यार्थी नोंदणी करताना आलेल्या अडचणी समस्या त्यावर उपायोजना*
Labels: शिक्षकांसाठी शैक्षणिक व्हिडिओ


